शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (07:39 IST)

श्रीकृष्ण नीती: 11 प्रभावशाली निर्णय

धर्म, सत्य आणि न्यायसोबत असणारी व्यक्तीच योग्य आहे. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने धर्माला साथ दिली होती. धर्म म्हणजे सत्य, न्याय आणि देव. सत्य कुठे आहे? हे विचार करण्यासारखे आहे.
 
येथे हे सांगणे महत्वाचे आहे की महाभारत काळापासून आजतायगत युद्धा आणि खेळाचे क्षेत्र बदलत गेले पण युद्धामध्ये जे कपट करण्याचे प्रस्त चालत आले आहे ते आजतायगत देखील सुरु आहे. अश्या परिस्थितीमध्ये सत्याला प्रत्येक आघाडीवर पराभवाचा सामना करावा लागतो. कारण नेहमीच सत्याचा साथ देणारा कृष्ण बरोबर नसतो. अशावेळी कृष्ण नीती समजून घ्यावी लागते.
 
1 शत्रू सामर्थ्यवान असल्यास त्याचाशी थेट लढण्याऐवजी मुत्सद्दीने लढायला हवं. भगवान श्रीकृष्णाने कालयवन आणि जरासंधा बरोबर हेच केले होते. त्यांनी कालयवनाला मुचकुंदाच्या हाती ठार मारले तर जरासंधाला भीमाच्या हातून ठार मारले. हे दोन्ही योद्धा सामर्थ्यवान होते. परंतु कृष्णाने या दोघांना युद्धाच्या आधीच संपवले होते. खरे तर सरळ मार्गावरून सर्व काही मिळवणं सोपं नसतं. विशेष करून तेव्हा ज्यावेळी विरोधी पक्ष वरचढ असतात. अश्यावेळी मुत्सद्दीचा मार्ग निवडायला हवा.
 
2 युद्धामध्ये संख्याबळ महत्वाचे नसतं पण साहस, धोरण आणि योग्य वेळी योग्य शस्त्र आणि व्यक्तीचा वापर करणे हे महत्वाचे आहे. पांडवांची संख्या कमी होती पण कृष्णाच्या धोरणामुळे ते जिंकले. त्यांनी घटोत्कचाला त्यावेळी युद्धामध्ये आणले ज्यावेळी त्याची गरज होती. त्याचे बलिदान व्यर्थ नाही गेले. त्या मुळेच कर्णाला आपले अमोघास्त्र चालवावे लागले. जे त्याला अर्जुनावर चालवायचे होते.
 
3 एखादा राजा किंवा सेनापती आपल्या प्रत्येक सैन्याला राजा समजून त्याचे रक्षण करतं तो नेहमीच जिंकतो. प्रत्येक सैन्याचे आयुष्य अमूल्य आहे. अर्जुनासह पाच पांडवांनी आपल्याबरोबर युद्ध करीत असलेल्या सर्व योद्ध्यांना वेळोवेळी वाचवले आहे. जेव्हा ते बघायचे की आपल्या एखाद्या योद्धावर विरोधीपक्षाचे सैन्य किंवा योद्धा वरचढ होत आहे, ते त्याच्या मदतीसाठी त्वरित धाव घ्यायचे.
 
4 जेव्हा आपल्याला आपल्या शत्रूला मारण्याची संधी मिळत असल्यास त्याला त्वरित ठार मारावे. तो वाचल्यावर आपल्याला डोकेदुखी होईल किंवा आपल्या पराभवाला कारणीभूत असू शकेल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शत्रू वाचायला नको. कृष्णाने गुरु द्रोण आणि कर्ण सोबत हेच केले होते.
 
5 कोणतेही वचन, करार आणि तडजोड हे स्थिर नसतं. त्यामुळे देशाचे, धर्माचे, सत्याचे नुकसान होत असल्यास ते मोडायलाच हवे. भगवान श्रीकृष्णाने शस्त्रे न बाळगण्याची आपली घेतलेली शपथ मोडून धर्माचे रक्षण केले होते. ज्यावेळी अभिमन्यूला भीष्माने बनवलेल्या कायदाच्या विरुद्ध निःशस्त्रच ठार मारले होते तेव्हा मग श्रीकृष्णाने युद्धाच्या कुठल्याही कायदाचे पालन केले नाही. अभिमन्यू श्रीकृष्णाचा भाचा होता. श्रीकृष्णाने त्याच क्षणी ठरवले की आता या युद्धात कुठल्याही कायदाचे पालन करावयाचे नाही. तेव्हा सुरु झाले कृष्णाचे मुत्सद्दीचे खेळ.
 
6 युद्धाच्या सुरुवातीस हे स्पष्ट झाले पाहिजे की कोण कोणाच्या बाजूने आहे ? कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे ? अश्याने युद्धामध्ये कोणत्याही प्रकारे धांदळ होत नाही. पण असे ही दिसून आले आहे की बरेच असे योद्धा होते जे विरोधी पक्षामध्ये असून देखील विश्वासघात करायचे अश्या लोकांना ओळखणे आवश्यक असतं.
 
7 युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार, जखमींवर उपचार, लक्षवेधी सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व सैनिकांच्या शस्त्रांचा पुरवठा करण्या सारखे काम व्यवस्थिरित्या पार पाडले गेले असे. आपल्या हे जाणून आश्चर्य होणार की हे सर्व कार्य श्रीकृष्णाच्या देखरेखमध्ये आणि त्यांचा धोरणाखाली घडत असे.
 
8 या भयंकर युद्धाच्या प्रसंगी देखील श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान दिले. हे सर्वात आश्चर्यकारक होत. सांगावयाचे असे की एखादी व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही आघाडीवर युद्ध करतं असल्यास त्याला ज्ञान, सत्संग आणि प्रवचन ऐकत राहावं. हे प्रेरणेसाठी गरजेचे आहे. या मुळे त्या व्यक्तीचे लक्ष आपल्या उद्दिष्ठाकडे राहते.
 
9 भगवान श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे युद्धाला सांभाळले होते त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याला सांभाळले होते. त्यांनी प्रत्येक योजना व्यवस्थित रचली होती. हे शक्य झाले शिस्त पाळणे, उगाच काळजी न करणे आणि भविष्या ऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्याने. म्हणजे की आपल्याकडे 5, 10 किंवा 15 वर्षाची योजना नसल्यास आपल्याला यशाची प्राप्ती होईलच अशी हामी देऊ शकत नाही.
 
10 कृष्णाने शिकवले आहे की संकटाच्या वेळी किंवा यशप्राप्ती न झाल्यामुळे त्यावेळी आपले धैर्य गमावू नका. ह्या ऐवजी अपयशी होण्याचे कारणे जाणून पुढे वाढावे. एकदा काय आपण भीतीवर विजय मिळवली की विजय आपल्या पायाशी लोटांगण घालणार.
 
11 महात्मा गांधीच्या धोरणानुसार साध्य आणि साधन दोघांचे शुद्ध असणे गरजेचे आहे. आपले हेतू चांगले असल्यास ते पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाची किंवा विधीची निवड केली पाहिजे. चाणक्याच्या धोरणानुसार सत्य आणि न्यायासाठी साधनं काहीही असल्यास काही ही फरक पडत नाही. चाणक्याने हे धोरण बहुदा महाभारतातील भगवान श्रीकृष्णा कडूनच शिकली असावी. तसं श्रीकृष्णाच्या धोरणाला कोणीही समजू शकत नाही.