यंदा 10 जूनच्या मध्यरात्री नंतर 3.40 मिनिटाने पंचक काळ सुरू होत आहे. हे 15 जूनच्या मध्यरात्री नंतर 3.18 पर्यंत असणार. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ कार्ये करण्यासाठी मुहूर्त बघितले जातात. असा नियमच आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे पंचक.
ग्रंथांनुसार जेव्हापण कोणतेही काम केले जाते त्यावेळी शुभ मुहूर्ताच्या बरोबर पंचकाचे विचार देखील केले जाते. पंचक काळ शुभ मानले जात नाही. या काळात केलेले काम हानिकारक परिणाम देतात. म्हणून या नक्षत्राचा संयोग अशुभ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रामध्ये धनिष्ठा पासून ते रेवती पर्यंतचे जे 5 नक्षत्र (धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती) आहे ह्यांना पंचक म्हणतात. पंचकाच्या या 5 दिवसामध्ये विशेष काळजी घ्यावयाची असते. म्हणून या पंचकाच्या दिवसामध्ये कोणतेही धोकादायक कार्य करणे टाळावे. त्याच बरोबर कोणतेही शुभ कार्ये करू नये. असे करणे टाळावं.
पंचकाशी निगडित 10 गोष्टी
1 पंचकामध्ये काही शुभ कार्य करू शकतो जसे की पंचकामधे येणारे उत्तर भाद्रपदा नक्षत्र वारांच्या बरोबर सर्व सिद्धीयोग बनवतं, तर शतभिषा, पूर्वा भाद्रपद, रेवती नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र हे प्रवास, व्यवसाय, आणि जावळ सारख्या शुभ कार्यासाठी श्रेष्ठ मानले गेले आहे.
2 जर का या दिवसात घरावर छत टाकावयाची गरजेची असल्यास तर ते करण्याआधी कामगारांना मिठाई खाऊ घाला मगच घरांवर छत टाका.
3 रेवती नक्षत्राच्या पंचकामध्ये मानसिक त्रास होण्याची दाट शक्यता असते.
4 कोणत्याही कारणास्तव आपल्याला दक्षिण दिशेस प्रवास करावा लागत असल्यास मारुतीच्या देऊळात 5 फळे अर्पण करून प्रवासाला निघावं.
5 पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पंचकात आजारी होण्याची दाट शक्यता असते.
6 पंचकाच्या काळात जर आपणास इंधनचा साठा करणे गरजेचे असल्यास पंचमुखी दिवा (कणकेपासून बनवलेला, तेलाने भरून) शंकराच्या देऊळात लावून या. त्या नंतरच इंधन घ्यावे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास देवघरात पंचमुखी दिवा लावू शकता. जेणे करून आपल्याला चांगली फलप्राप्ती होऊ शकते.
7 कोणा नातलगांच्या अंत्यसंस्काराची वेळ असो किंवा घरात कोणी मृत्यूला पावला आहे अश्या वेळी पंचक असल्यास अंत्यसंस्काराच्या वेळी 5 वेग वेगळे पुतळे बनवून त्यांना पेटवून मगच अंत्यसंस्कार करावं.
8 उत्तरा भाद्रपद नक्षत्रच्या पंचकामध्ये पैशांचे नुकसान आणि त्रास होण्याची शक्यता असते.
9 घरामध्ये लग्नाची शुभ वेळ आली असल्यास वेळेच्या कमतरतेमुळे लाकडी सामान विकत घ्यावयाचे असल्यास गायत्री हवन करवून लाकडाचे फर्निचर, पलंग आणि अन्य वस्तू विकत घेऊ शकता.
10 शतभिषा नक्षत्रामध्ये घरात किंवा कुटुंबातील लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.