कृष्णाची वैजयंती माळ कशी होती, 5 गुपित जाणून घ्या
वैजयंतीच्या झाडावर खूपच सुंदर फुल उमलतात. हे फुल खूप सुंदर आणि सुवासिक असतात. ह्यांचा बियाणांपासून माळ तयार केली जाते. वैजयंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ.
वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात. श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे. प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असतं.
1 असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा राधा आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती त्यावेळी राधाने त्यांना वैजयंतीची माळ घातली होती. वैजयंती एका प्रकारचा फुलांची वनस्पती आहे ज्यामध्ये लाल आणि पिवळे रंगाचे फुल येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाही, सडत नाही नेहमीच चकचकीत असतात. ह्याचा अर्थ असा आहे की जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत असेच राहा. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे, ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढतो. याचा अर्थ असे आहे की आपण कितीही यशस्वी झाला तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहा.
2 अशी आख्यायिका आहे की श्री कृष्ण दोन कारणामुळे वैजयंतीची माळ घालत असे. पहिले कारण हे की वैजयंतीच्या माळे मध्ये सौंदर्य आणि माधुर्याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी वास्तव्यास असते. कारण भगवान श्रीकृष्ण यांचा मनात राधाचे पाऊल उमटलेले आहेत. म्हणून श्री लक्ष्मी यांनी वैजयंती माळेला आपल्या वास्तव्यास साठी निवडलेले आहे. जे नेहमी श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते. आणि दुसरे कारण असे की श्रीकृष्णाला ही माळ सतत राधेची आठवण करून देत होती, ज्याला आधी मथुरेचा एक माळी आणत असतं.
3 काही विद्वान सांगतात की या वैजयंतीच्या माळेत पच प्रकारांचे मणी गुंफले जाते. जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. या मणींचे नाव इन्द्रनीलमणि (पृथ्वी), मोती (जल), पद्मरागमणि (अग्नि), पुष्पराग (वायुतत्त्व) वज्रमणि म्हणजे हीरा (आकाश) आहेत.
4 वैजयंती माळेचे महत्त्व : एका आख्यायिकेनुसार इंद्राने अभिमानास्तव वैजयंती माळेचा अवमान केला होता, त्या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्या वर रुसली होती परिणामास्तव त्यांना वणवण भटकावे लागले. देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावत वर प्रवास करत होते. वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले त्यांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरूपात दिली.
इंद्राने ह्याला आपला अपमान समजून ती माळ आपल्या हत्ती ऐरावतच्या गळ्यात घालून दिली, आणि ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून पाय खाली चिरडून दिली. आपल्या दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचे बघून महर्षी दुर्वासाने संतापून इंद्राला लक्ष्मीहीन होण्याचे श्राप दिले.
5 वैजयंतीचे फायदे : वैजयंतीचे फूल आणि माळ खूप शुभ आणि पवित्र असतात. वैजयंतीचे फुलांचे अतिशय भाग्यवान असे झाड असतं. ह्याची माळ घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. या माळेला कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन घालावी.
वैजयंतीच्या बियाणांची माळेने भगवान विष्णू किंवा सूर्याची पूजा केल्याने ग्रह नक्षत्रांचे प्रभाव नाहीसे होतात. विशेषतः शनीचा दोष नाहीसा होतो. ही माळ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ह्याला घातल्याने किंवा दररोज या माळेने आपल्या इष्ट देवांचे जप केल्याने नवी शक्तीचा संचार होऊन आत्मविश्वास वाढतो.
ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते. मानसिक शांती मिळते ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात मन लावून काम करते. अशी आख्यायिका आहे की पुष्य नक्षत्रामध्ये वैजयंतीच्या बियाणांची माळ घालणे खूप शुभ असतं. ही माळ सर्व प्रकारांच्या इच्छापूर्ण करते.
या वैजयंती माळेने 'ऊं नमः भगवते वासुदेवाय' मंत्राचा नियमाने जप केल्याने वैवाहिक जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. जप केल्यावर केळ्याच्या झाडाची पूजा करावी.