खंडोबा किंवा खंडेराय हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने ९६ कुळी क्षत्रिय मराठे, इतर बलुतेदार समाजाचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असे कुलदैवत आहे. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पाच बायकांची नावे
खंडोबा यांना पाच बायका होत्या. मात्र त्याच्या पहिल्या दोन पत्नी म्हाळसा आणि बानाई या सर्वात महत्त्वाच्या आहेत. दोन बायका असलेल्या राजा किंवा देवाची कहाणी संपूर्ण भारतात काही प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते जसे की मुरुगन आणि त्यांच्या पत्नी देवसेना आणि वल्ली किंवा वेंकटेश्वर, लक्ष्मी आणि पद्मावती ही काही उदाहरणे आहेत.
जेजुरीच्या खंडोबाला दोन मुख्य पत्नी होत्या: म्हाळसा (पट्टराणी) ही एका व्यापाऱ्याची (वाणी) मुलगी होती आणि बाणाई (किंवा बानू) ही धनगर समाजाची होती. परंतु वाघ्यामुरळीच्या गाण्यांमध्ये आणि काही लोककथांमध्ये खंडोबाच्या एकूण पाच बायकांचा निर्देश येतो. यांमध्ये म्हाळसा आणि बानू यांच्याव्यतिरिक्त तीन बायकांचा समावेश होतो त्या म्हणजे फुलाई (माळीण/तेलीण), रंभाई (शिंपीण) आणि चंदाई (बागवानीण/मुस्लिम)
म्हाळसा: एका श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी, जिला स्वप्नात खंडोबाचे दर्शन झाले होते.
बाणाई: इंद्राची मुलगी असे मानले जाते.
रमाबाई: ही तिसरी पत्नी आहे.
फुलाई: ही तेलीण जातीची चौथी पत्नी आहे.
चांदाई: ही पाचवी पत्नी आहे, जी मुस्लिम आहे.
मुख्य राण्यांपैकी म्हाळसा पट्टराणी (मुख्य राणी) म्हणून ओळखली जाते. ती एका वाणी (व्यापारी) समाजाच्या व्यक्तीची मुलगी होती. म्हाळसा अतिशय सुंदर, रूपवान आणि सुसंस्कृत मानली जाते. ती संस्कृती, सौंदर्य आणि नियमांचे पालन करण्याचे प्रतीक आहे. एका मान्यतेनुसार, म्हाळसा ही साक्षात पार्वती देवीचा अवतार आहे. जेजुरी गडावरील मुख्य मंदिरामध्ये खंडोबासोबत म्हाळसा देवीची मूर्ती आहे.
तर बाणाई ही खंडोबाची दुसरी आणि धाकटी पत्नी आहे. तिला 'बानू' या नावानेही ओळखले जाते. बाणाई धनगर (मेंढपाळ) समाजाची होती. ती देवांना आणि संतांना मेंढ्या चारत असताना खंडोबाच्या संपर्कात आली. ती साधी, राकट, निर्भीड आणि प्रेमळ मानली जाते. तिच्यामध्ये स्वाभाविक प्रेम आणि निष्ठा दिसून येते. ती प्रकृती, प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे. अनेक लोककथांनुसार, बाणाई ही इंद्राची कन्या मानली जाते, जिने मर्त्यलोकात धनगर समाजात जन्म घेतला. खंडोबाने तिला मिळवण्यासाठी वेषांतर करून धनगरांचे काम केले होते.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी, कडेलोट नावाच्या ठिकाणी, बाणाईचे वेगळे मंदिर आहे. खंडोबाच्या मुख्य मंदिरात तिची मूर्ती नाही, कारण बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातातील म्हणून आंध्र तेलंगणात खंडोबाला मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखले जाते. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा त्यांचा दोन बायका असून, त्या दोघींही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत.
अस्वीकारण: ही माहिती विविध स्तोत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.