गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगळुरु , गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (16:22 IST)

‘वर्क फ्रॉम होम' हा कायमस्वरूपी पर्याय नाही

Work from home
कोरोनाची लस ज्यावेळी बाजारात येईल त्यावेळी ती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी कोणाकडूनही पैसे घेतले जाऊ नयेत, अशी भूमिका इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडली आहे. तसेच यापुढे ‘वर्क फ्रॉम होम' चालू ठेवण्यासही त्यांनी विरोध दर्शवला. घरुन काम करण्याची सुविधा हा कायम स्वरूपाचा पर्याय नाही, असेही मूर्ती यांनी म्हटले आहे.
 
मूर्ती म्हणाले, मला मान्य आहे की कोरोनाची लस ही सार्वजनिक असावी. तसेच प्रत्येक व्यक्तीला ही लस मोफत मिळावी. त्यासाठी लस बनवणार्याम सर्व कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांकडून निधी मिळायला हव्या. दरम्यान, कायमस्वरूपी घरूनच काम करण्याच अर्थात ‘वर्कफ्रॉम होम'च्या सुविधेवर मूर्ती यांनी असहमती दर्शवली. त्यांनी म्हटले, भारतात बहुतेक लोकांची घरे छोटी आहेत. ज्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. त्याचबरोबर थोड्या-थोड्या कालावधीसाठी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यासाठी पीपीई किट, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि ग्लोव्हज्‌ यांसह अन्य सुरक्षा नियमांचे पालन होण गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.