शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:25 IST)

सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये जातीचा उल्लेख, नेटिझन्सने जोरदार टीका केली

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवर नेटिझन्सकडून टीका केली जात आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाकरे आणि पवार कुटुंबीय एकत्र आले आणि त्यांचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी 'My CKP Moment - Patankar- Sardesai - Thackeray - Sule!' असे लिहिले आहे.
 
या फोटोला अशा प्रकाराच्या कॅप्शनमुळे नेटिझन्स जोरदार टीका करत विचारत आहे की लोकप्रतिनिधींनी जातीचा उल्लेख करणं योग्य आहे का? अनेकांनी यावर नाराजी जाहीर केली असून सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.