1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (13:03 IST)

सुना है आज समंदर को बडा गुमान आया है...यावर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल

सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी अलीकडेच एक फोटो ट्वीट केला आहे ज्याला कॅप्शन दिले आहे... “सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है !” त्याचसोबत #everydayiswomansday आणि #courage असे हॅशटॅग वापरले आहेत. 
 
त्यांनी हे उत्तर त्यांच्यावर केले जात असलेल्या आरोपांवर करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात अमृता फडणवीस यांनीही उडी घेत सरकारवर आरोप केला होता. अमृता फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'ज्या प्रकारे सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरण हाताळण्यात येत आहे, त्यानंतर मुंबईने माणुसकी सोडली असून हे शहर आता निरागस आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी सुरक्षित नाही, असं मला वाटतं,' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.  त्यांच्या या ट्विटवर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या. 
 
आता या नवीन संदेशवरुन लोकं पुन्हा टीका करत आहे... कोणी त्यांच्यावर लुकवर तर कोणी त्या सोशल मीडियावर करत असलेल्या मनोरंजनाबाबद बोलत आहे.