सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (14:19 IST)

राम प्रेम हैं, वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकते: राहुल गांधी यांचं ट्विट

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं. यात त्यांनी प्रभुंच्या गुणांचं वर्णन या प्रकारे केलं.
 
“मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे.
 
राम प्रेम आहे. 
ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही
 
राम करूणा आहे. 
ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही
 
राम न्याय आहे. 
ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही
 
असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.