सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (13:44 IST)

Ayodhya Ram Mandir: 'रामलल्ला' झाले अब्जाधीश

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा आज होत असला तरी याआधीच रामलल्ला अब्जाधीश झाले आहेत. भूमीपूजनाच्या घोषणेपूर्वी कोटी रुपये जमा झाले आहेत. जगभरातून लाखो राम भक्त ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत असल्याचे अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिली आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना झाल्यावर मंदिर बांधकामासाठी एसबीआय बॅंकेत खाते उघडले गेले. लॉकडाऊन दरम्यान भाविकांनी दान म्हणून साडेचार कोटी रुपये जमा केले आणि नंतर राम मंदिर भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली आणि देणगी वाढत गेली. पूर्व न्यासाकडून मिळालेले दान-दक्षिणा 10 कोटी रुपये एवढे आहे.
 
शिवसेनेकडून एक कोटी रुपये खात्यात जमा केले गेले आहे तसेच संत मुरारी बापूंच्या आवाहनावरून त्यांच्या अनुयायांनी चार दिवसांत 18 कोटींची रक्कम जमा केली. 
 
ट्रस्टद्वारे सोशल मीडियावर यासाठी अभियान सुरु करण्यात येणार असून जाहिराती दिल्या जातील. घर-घर पोहचून लोकांना सेवेसाठी आग्रह करण्यात येईल. एक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे देशातील देणगी देणार्‍यांपैकी 60 टक्के देणगीदार तरूण वयोगटातील आहेत.