संबंधित माहिती
- ऑन लाईन फूड ऑर्डर करताना आणि डिलेव्हरी घेताना ही खबरदारी घ्या, नाही तर संसर्गाचा धोका
- ११ वी ऑनलाईन प्रवेश, एसईबीसीसाठी १२ टक्के आरक्षण
- बीएसएनएलची ऑफर! पैसे रिचार्जसाठी नाहीत, म्हणून कंपनी इतक्याचे कर्ज देत आहे, असा घ्या फायदा
- पंढरपूरच्या श्री विठ्ठल-राक्मिणी मंदिरातून ऑनलाइन दर्शन सुविधा
- नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन!
कोरोनाच्या संकटकाळात घरबसल्या SBI देत आहे कर्ज!
कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तरी या बँकेमुळे चिंतेचं कारण नाही. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या पर्सनल लोन (Personal Loan) देत आहे.
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन प्री-अप्रव्हूड लोन मिळवू शकता. केवळ 4 सोप्या स्टेप्समध्ये तुमचे हे काम पूर्ण होईल. हे पर्सनल लोन तुम्ही कोणत्याही वेळी 24X7 प्राप्त करू शकता. ग्राहक केवळ 4 क्लिकमध्ये YONOअॅपच्या माध्यामातून हे लोन मिळवू शकतात.
एसबीआयने (SBI) ने ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, ग्राहक कर्ज घेण्याची पात्रता SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकतात. याकरता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून PAPL<space><last 4 digits of Account No.> असा मेसेज 567676 वर करावा लागेल. बँकेचे हे कर्ज निश्चित करण्यात आलेल्या काही मापदंडाच्या आधारे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईलIt only takes 4 clicks to apply for a Pre-Approved Personal Loan via #YONOSBI. Offered only to select customers of the Bank.
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 27, 2020
SMS PAPL <SPACE> <last 4 digits of SBI a/c no.> to 567676 from your registered mobile number.
Click: https://t.co/ybclMk3VpO#SBI #PAPL #PersonalLoan pic.twitter.com/hmsUalmdKZ
या कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी द्यावी लागणारी फी देखील अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे हे कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना जास्त वेळ वाट देखील पाहावी लागणार नाही.
याची प्रक्रिया इस्टंट लोनअंतर्गत होते. त्याचप्रमाणे याकरता कोणतेही फीजिकल कागदपत्र देखील देण्याची गरज नाही आहे. बँकेची ही सुविधा 24 तास उपलब्ध आहे.
कसे कराल अप्लाय?
-याकरता सर्वात आधी तुम्हाला YONO App मध्ये लॉग इन करावे लागेल
-त्यानंतर Avail Now या पर्यायावर क्लिक करा
-त्यानंतर कर्जासाठी अवधी आणि रक्कम निवडा
-त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलनंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. त्यानंतर लोन मंजूर करण्यात येईल
पुढील लेख
