1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 31 जुलै 2020 (14:37 IST)

लॉकडाउनमध्ये, दीपिका पादुकोण तिच्या चाहत्यांना सर्जनशीलतेसाठी देतेय प्रोत्साहन!

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे 'फॅनआर्ट शुक्रवार'. दीपिकाने 'फॅनआर्ट शुक्रवार' या ट्रेण्डद्वारे तिच्या चाहत्यांनी बनविलेले तिचे खास स्केच पोस्ट करणार असून, चाहत्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी तिने ही मालिका सुरू केली आहे.
 
या ट्रेण्डद्वारे ती चाहत्यांना अधिकाधिक सर्जनशील होण्यासाठी प्रोत्साहित करत असून त्या कलाकाराच्या कलागुणांचे कौतुक करत आहे. चाहत्यांनी पाठवलेले हे स्केचेस दीपिका वैयक्तिकरित्या पाहते, स्केच निवडते आणि दर शुक्रवारी ते पोस्ट करते. नेटिझन्स, चाहते या संपूर्ण प्रक्रियेचा मनापासून आनंद  घेत असून दीपिकासोबत कला निर्मितीसाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत.
 
शुक्रवारच्या या फॅन आर्टसाठी दीपिकाने राहिल गॅलरीने फुललेल्या फुलांचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या पाकळ्यापासून बनविलेली ही एक अतिशय सुंदर कलाकृती आहे. हे रेखाटन पाहताक्षणीच आपले लक्ष वेधून घेते, जसे त्याने दीपिकाचे देखील लक्ष वेधले आहे. हे रेखाटन  खूपच अनोखे आहे आणि म्हणूनच अभिनेत्रीने हे आपल्यासोबत शेअर केले आहे.
 
दीपिका पादुकोण ही अशी अभिनेत्री आहे जी तिच्या चाहत्यांसाठीची कृतज्ञता दाखवण्यासाठीची एकही संधी सोडत नाही. या अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत आणि या ट्रेण्डद्वारे ती देत असलेले प्रोत्साहन या लॉकडाऊनमध्ये तिच्या चाहत्यांची सर्जनशील बाजू बाहेर आणण्यास मदत करत आहे.
 
दीपिकाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर 50 दशलक्षांचा आकडा ओलांडला आहे आणि चाहत्यांच्या या प्रेमाबद्दल ती अत्यंत कृतज्ञ आहे. नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये दीपिका आणि प्रभास हे दोन सुपरस्टार नाग अश्विनच्या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा पॅन इंडिया बहुभाषिक प्रकल्प असून भव्य प्रमाणात बनविण्यात येण्याची आशा आहे.
 
तसेच, अभिनेत्री शकुन बत्राच्या सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे.