गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (12:09 IST)

दीपिका पादुकोणने आपली आवड जोपासण्यासाठी आपल्या मनाचे ऐकले, जे आज यशाच्या रूपात सर्वांच्या समोर आहे!

Deepika Padukon listen to her heart
दीपिका पादुकोणने नुकत्याच एका ग्रॅज्यूएशन पार्टीच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या दरम्यान 2020 च्या विद्यार्थ्यांना संबोधित केले, ज्यामध्ये अभिनेत्रीने आपली आवड जोपासण्यासाठी कॉलेज अर्ध्यावर सोडल्याचे सांगितले.
 
आज दीपिका पादुकोण जगातली सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, जी जगभरातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे. मात्र स्टार बनण्याआधी अभिनेत्रीने पुढील शिक्षणातून आपले पाऊल मागे घेतले होते. विविध अंतरराष्ट्रीय मंचावरून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा आणि एक ग्लोबल चेहरा या नात्याने, दीपिकाने आपल्या  प्रतिभेच्या जोरावर स्वत:ची जागा निर्माण केली आहे आणि तिचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे.
 
सुरुवातीच्या दिवसात, जेव्हा दीपिका कॉलेजमध्ये होती, ती तेव्हापासूनच एक यशस्वी मॉडेल होती आणि तिने बॉलीवुडमध्ये एक अभिनेत्री होण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व काही सोडले होते. अभिनेत्रीने आपल्या या प्रेरणात्मक प्रवासासोबत गत दिवसांच्या आठवणी सांगताना म्हटले की ती केवळ परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास करायची. गुण आणि श्रेणी हे तिच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. तिला सुरुवातीपासूनच अभ्यासापेक्षा अधिक रुचि एक्स्ट्रा करिक्यूलर एक्टिविटीजमध्येच होती.  
 
दीपिकाने सांगितले की, रचनात्मक गोष्टी आणि परफॉर्मंसकडे कल असल्यामुळे, तिला नेहमीच समारंभांमध्ये भाग घेणे, खेळणे किंवा केवळ थिएटर करणे हाच तिचा आनंद होता. तिच्या म्हणण्यानुसार, अभ्यासाच्या तुलनेत एक्स्ट्रा करिक्यूलर एक्टिविटीजमध्ये मिळालेले पुरस्कार तिच्याकडे अधिक आहेत. ती शाळेमध्ये एक सामान्य श्रेणीची विद्यार्थी होती, मात्र आज मेहनत आणि आपला व्यासंग याच्या जोरावर ती आयुष्यात यशस्वी झाली आहे.
 
दीपिकाने आपल्या कौशल्याला अभिनयात केंद्रित केले आणि लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासून, अभिनेत्रीने आपल्या प्रतिभेसोबत खूप मोठे यश संपादन केले आहे. केवळ इतकेच नव्हे तर, अभिनेत्रीने अनेक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा देखील साकारल्या आहेत ज्यांनी आपल्या मनात खास जागा बनवली आहे. तिच्या यशाची ही कहाणी त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे, ज्यांना दृढ़ निष्ठेने आपली आवड जोपासण्याची इच्छा आहे, मात्र त्यांच्यापुढे कुणाचा आदर्श किंवा मार्गदर्शन नाही.