गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 5 जुलै 2020 (07:18 IST)

अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट बनवणार

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण गलवान खोऱ्यातील शहीद झालेल्या २० जवानांच्या शौर्यावर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर जाहीर केले की, गलवान खोऱ्यात घडलेल्या या घटनेवर अजय देवगण चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. अभिनेता अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटाच्या नावाचा अद्याप विचार केलेला नाही. या चित्रपटात चिनी सैन्यासह जोरदार लढा देणाऱ्या २० भारतीय जवानांची शौर्यगाथा दाखविली जाणार आहे. मात्र या चित्रपटाच्या कलाकारांचादेखील अद्याप विचार केलेला नाही, असे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे.
 
दरम्यान गलवान खोऱ्यातील जवानांच्या शौर्यावर चित्रपट येणार असल्याने सगळ्याच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पाकिस्तानविरूद्ध सर्जिकल स्ट्राईकवरही उरी चित्रपट तयार करण्यात आला होता.