गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जुलै 2020 (12:13 IST)

लॉकडाउनमध्ये साइन केले तीन चित्रपट

कलाविश्वात अनेकदा दमदार कलाकार असूनही कायमची वाट पाहावी लागते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कामाच्या शोधात असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांना 'बधाई हो' सारखा दमदार चित्रपटसुद्धा मिळाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका   प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

त्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स येऊ लागले. सध्या लॉकडाउनमध्ये त्यांनी तीन चित्रपट साइन केले आहेत. लॉकडाउनदरम्यान सहा स्क्रीप्ट वाचल्या असून त्यातल्या तीन आवडल्याचे नीना गुप्ता यांनी नुकतच्या दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. त्या तीनपैकी एक चित्रपट दिग्दर्शक शाद अली यांचा आहे. जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल तेव्हा मुंबईला परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.