शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (08:19 IST)

दुधाच्या वाहतुकीत पश्चिम रेल्वेचा नवा इतिहास

भारतीय रेल्वे कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठ्या प्रमाण योगदान देत आहेत. लॉकडाऊन काळात आयसोलेशन कोच निर्मिती पासून ते कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी इनट्यूबेशन बॉक्सची निर्मिती, तसेच रेल्वेतर्फे मास्क निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे. ज्यात वैद्यकीय साधने, अन्नधान्य, कोळसा, पेट्रोलियम पदार्थांचा समावेश आहे. दुधाच्या वाहतुकीत पश्चिम रेल्वेने आता एक नवीन इतिहास रचला आले.

पश्चिम रेल्वेने दुधाच्या ५१ गाड्या (८८२ टँकर) गुजरातमधील पालनपुर येथून हरियाणाच्या पलवाल येथे पोहोचविल्या आहेत. तसेच संपूर्ण देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोहोचविण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष वाहतूक केली आहे. २२ ते ३१ मार्च दरम्यान ३३. ३२ लाख लीटर दुधाच्या ५ गाड्या, एप्रिल महिन्यात १ कोटी लीटर दुधाच्या १५ तर मे महिन्यात १ कोटी २८ लाख लीटर दुधाच्या १७ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. तर २८ जूनपर्यंत १ कोटी ९ लाख लीटर दुधाच्या १४ गाड्या धावल्या आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वे प्रशासनाने ४ लाख ८ हजार दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दुधाची वाहतूक करून पश्चिम रेल्वे आपल्या नावावर इतिहास रचला आहे.