मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जुलै 2020 (11:27 IST)

आश्चर्य : धोनी इन्सटाग्रामवर फक्त तिघांनाच करतो फॉलो

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी गेल्या वर्षभरापासून मैदानावर दिसलेला नाही. त्याच्या निवृत्तीच्या चर्चाही सातत्याने होत आहेत. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. कॅप्टन कूल असलेल्या धोनीचा आज वाढदिवस. सोशल मीडियावर धोनी ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. धोनीचा वाढदिवस एखादा सण असल्यासारखा साजरा केला जातो.

भारताचे स्टार खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय दिसतात. विराट कोहली त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून कोट्यवधींची कमाई करतो. सचिन, विराटनंतर धोनी इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअरस् असलेला खेळाडू आहे. मात्र तो फारसा सक्रीय दिसत नाही. त्यानं खूपच मोजक्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत.

फेसबुकवर गेल्या सहा महिन्यात धोनीने फक्त 10 पोस्ट केल्या आहेत. त्यातील 7 जाहिराती असून तीन खाजगी पोस्ट केल्या आहेत. यात एक झिवाचा फोटो आहे तर एकामध्ये सहकाऱ्यांसोबत खेळत असलेला व्हिडिओ आहे. याशिवाय तिसरा व्हिडिओ रांचीतील ऑर्गॅनिक फार्मिंगचा आहे.

अनेक स्टार्स आणि खेळाडू हे ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतात. काही घडलं की लगेच ट्विट करतात किंवा प्रतिक्रिया नोदंवतात. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने फक्त तीनच पोस्ट केल्या आहेत. धोनी नेहमची प्रसिद्धीपासून दूर राहिला आहे. कर्णधार असतानाही तो पत्रकार परिषदा वगळता कुठेही फारसा बोलताना दिसलेला नाही. आताही त्यानं निवृत्तीबाबत एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इन्स्टाग्रामवर धोनीनं त्याची लाडकी लेक झिवाचंही अकाउंट काढलं आहे. त्यानं झिवासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र त्याच्या इन्स्टा अकाउंटवर आतापर्यंत फक्त 106 पोस्ट केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय असताना धोनी मात्र कुठेच दिसत नाही. इन्स्टावर तो फक्त तीनच लोकांना फॉलो करतो. यामध्ये पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.