अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, गृहमंत्रालयाने दिली परवानगी
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-१९ च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था अंतिम परीक्षा घेऊ शकतात, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.”केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.