मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (16:30 IST)

स्वदेशी असलेली कोरोना लस तयार, मानवी चाचणीला परवानगी

भारतात कोरोनावर लस तयार झाली असून बायोटेकने ही लस बनवली आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या लसीला मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे.
 
भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे कोरोनावरील ही लस फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
 
भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत.
करोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही करोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३) ही लस बनवण्यात आली आहे