गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (21:57 IST)

लिक्विड आणि पावडर स्वरूपात असलेल्या कोरोना औषधांची ट्रायल सुरु

liquid and powder trial starts in Russia on Corona Virus
रशियाने करोना व्हायरसच्या उपचारासाठी तयार केलेल्या वॅक्सीनची क्लीनिकल ह्यूमन ट्रायलसाठी सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या औषधांची ट्रायल घेण्यासाठी आम्ही दोन गट केले आहेत. प्रत्येक गटात 38-38 लोक असणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 
 
ही वॅक्सीन गामालेया सायंटिफिक रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. या वॅक्सीनचे ह्युमन ट्रायल दीड महिन्यात पूर्ण होईल, असे या इंस्टिट्यूटचे संचालक अ‍ॅलेक्झेंडर जिंट्सबर्ग यांनी सांगितले. लिक्विड आणि पावडर या दोन्ही औषधांची चाचणी मॉस्कोमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी होईल. बर्डेन्को मिलिट्री हॉस्पिटलमध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देऊन द्रव औषधाची चाचणी केली जाईल. ही पावडर इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे स्वयंसेवकांच्या शरीरात दिली जाईल. मॉस्कोच्या सेशेनोव्ह फर्स्ट स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल केली जाईल. या ट्रायलचे फायदे आणि तोटे याबद्दल रशियाने सर्व स्वयंसेवकांना माहिती दिली आहे. ही लस दिल्यानंतर 28 दिवस स्वयंसेवकांच्या शारिरीक कृतींवर नजर ठेवली जाईल. या दरम्यान, वॅक्सीनच्या परिणामाचा सखोल अभ्यास केला जाईल.