गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 1 जून 2020 (07:52 IST)

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही; सरासरीनेच गुण देणार

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत चर्चा सुरू होती. परीक्षा होणार कि नाही? असा संभ्रम विद्यार्थी आणि पालकांमध्ये झाला होता. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. सध्या तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला तेव्हा ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्यातल्या कुलगुरूंसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षा न घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.
 
जूनमध्ये परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. जुलैमध्ये परीक्षा होतील याची शक्यता नाही. ऑगस्टमध्ये काय होईल याची कल्पना नाही. तोवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवता येणार नाही. त्यामुळे सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून अंतिम गुण दिले जाणार आहेत. त्यावर निकाल दिला जाणार आहे. तर आपले गुण कमी झाले आहेत, असे कोणत्या विद्यार्थ्याला वाटलं तर त्यांना पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जसं जमेल तसं पुन्हा परीक्षा देण्याची देखील संधी दिली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.