शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (08:37 IST)

गोव्यात पर्यटनाला परवानगी, मात्र कडक नियम लागू

एकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
 
“सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. किंवा प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या क्वारंटाईन ठेवलं जाईल,” असं अजगावकर म्हणाले.
 
ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे,”असंही पर्यटनमंत्री म्हणाले.