मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (14:26 IST)

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

स्थान: कोल्लम-शेनकोट्टा रस्त्यावर कोल्लमपासून अंदाजे 75 किमी
 
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
 
पलरुवी म्हणजे दुधाचा प्रवाह 300 फूट उंच खडकांवरून खाली येतो. हे एक सुंदर सहलीचे ठिकाण आहे. पीडब्लूडी इंस्पेक्शन बंगला आणि केटीडीसी मॉटेलमध्ये रहाण्याची उत्तम सोय केली जाते..
 
दुधाळ धबधब्याचा आवाज, आपल्या पृष्ठभूमीत धुक्याची वस्त्रे परिधान करणार्‍या निळ्या डोंगरांच्या आणि हिरव्यागार दर्‍या खोर्‍यांच्या नीरव शांततेला भंग करणारा एकमेव आवाज आहे.
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचे रेल्वे स्थानक: अंदाजे 75 किमीवर असलेले कोल्लम.
जवळचा विमानतळ: कोल्लम शहरापासून अंदाजे 72 किमी वर असलेले थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ.