आमच्या देशात फिरायला या, आम्ही स्वागत करतो
कोरोनाच्या संकटात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही देशांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर जारी केली आहे.
युरोपियन सायप्रस देशाने खास ऑफरची सुरुवात केली आहे. पर्यटन क्षेत्रात वाढ होण्याकरिता सायप्रसने पर्यटकांसाठी एक विशेष ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. तिथल्या सरकारने सांगितले आहे की, देशातील कोणत्याही पर्यटकाला कोरोनाची लागण झाली तर त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. यादरम्यान कोरोना रुग्णाचा जाण्या-येण्याचा खर्च, हॉटेलचे बिल आणि औषधसह खाण्या-पिण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे.
सायप्रसच्या विदेश मंत्रालयाने सांगितले की, पर्यटकांना सुरक्षित वाटावे आणि महामारीला घाबरू नये हिच त्याची इच्छा आहे. एका वृत्तानुसार सायप्रसची अर्थव्यवस्थेमधील १५ भाग पर्यटकांवर अवलंबून आहे.
नुकत्याच आलेल्या अहवालात सायप्रस देशात कोरोना विषाणूचा जास्त प्रादुर्भाव नाही आहे. यापूर्वी देशात एक हजार पेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. ज्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सायप्रस देशानंतर अनेक देशांमध्ये पर्यटनांवरील निर्बंध हळूहळू हटवण्याचा विचार केला जात आहे.