1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (16:43 IST)

पीपीई किट देतो, खासगी दवाखाने सुरु करा

PPE offers kits
कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र करताना इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. अनेकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरु करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी खासगी दवाखाने अजुनही बंद आहेत. खासगी दवाखाने बंद ठेवले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. आता पुन्हा एकदा खासगी दवाखाने सुरु करा, असे आवाहन करताना खासगी डॉक्टरांना पीपीई किट देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले दवाखाने सुरु करावेत, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आवाहन केले आहे. पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी, असेही डॉ. शिंगणे यावेळी सांगितले आहे.