Birthday : कॅप्टन कूल एम. एस. धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, यष्टीरक्षक पटू, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी ऊर्फ माही हा आज त्यांचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताला १९८३ नंतर २०११ साली वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या या खेळाडूवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या जात आहे. एस. एस. धोनी यांची क्रिकेटमधील कारकिर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट सिक्सर असो वा त्याची लांब केसांची हेअर स्टाईल तरुणांमध्ये वेळोवेळी क्रेझ निर्माण करणारी राहिली आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारीत एम. एस. धोनी – अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून त्यांचे वैयक्तिक जीवन रुपेरी पडद्यावर साकारले गेले. त्याची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत या कलाकाराचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा चाहत्यांमध्ये होऊ लागली.
धोनीच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना
डिसेंबर २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात पदार्पण, शून्य रनने केली सुरूवात
महेंद्रसिंग धोनीच्यानावावर आतापर्यंत तीन मोठ्या ट्रॉफी आहेत. ज्यात २००७ सालचा २०-२० विश्वचषक, २०११ सालचा वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे
यष्ठीरक्षक म्हणून धोनीने आतापर्यंत ५०० सामन्यांत ७८० फलंदाजाना बाद केले आहे
सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १७८ स्टंपिंग्स केले आहेत
धोनीने वनडे सामन्यात आतापर्यंत एकूण २१७ षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे
धोनीच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे. ज्यात त्याने आपल्या १ हजार धावा कोणत्याही अर्धशतकाशिवाय धोनीने केल्या आहेत
सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक शतके ठोकली आहेत
धोनी पहिला अस खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळी आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला