रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 30 जून 2020 (08:29 IST)

टीम इंडियाच्या जर्सीत होऊ शकतो बदल

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्व क्रीडा संघटनांनाही बसला आहे. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयवरही आर्थिक संकटाची टांगती तलवार आहे. त्यातच टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल घडू शकतो. बीसीसीआय आणि टीम इंडियाची कीट पार्टनर असलेली कंपनी नाईकेयांच्यात कराराच्या नूतनीकरणावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे. टीम इंडियाचे कीट पार्टनर म्हणून नाईके कंपनीचा बीसीसीयआसोबतचा करार सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. चार वर्षांसाठी झालेल्या या करारासाठी नाईके कंपनीने बीसीसीआयला 370 कोटी रुपये मोजले आहेत. लॉकडाउन काळात नाईके कंपनीलाही मोठा फटका बसला आहे, त्यातच सामने होत नसल्यामुळे कंपनीनेबीसीसीआयला करार वाढवण्याची विनंती केली आहे.
 
मात्र बीसीसीआय हा करार वाढवण्यासाठी उत्सुक नसून सप्टेंबर महिन्यानंतर बीसीसीआय नवीन टेंडर काढण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी  प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. 
 
नाईके आणि बीसीसीआयमध्ये झालेल्या करारानुसार संघातील खेळाडूंना जर्सी, स्पोर्टस्‌ शूज आणि इतर साहित्य पुरवते. परंतु लॉकडाउन काळात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन देशांविरुद्धच्या मालिका रद्द केल्या आहेत. ज्याचा फटका बीसीसीआयसोबत स्पॉन्सर कंपन्यांनाही बसला आहे.
 
2006 सालापासून बीसीसीआय आणि नाईके कंपनीमध्ये करार झालेला आहे. त्यावेळेपासून टीम इंडिया आणि नाईकेचे नाते आहे. परंतु यंदा हा करार न झाल्यास टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल होऊ शकतो.