शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (14:34 IST)

दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामच्या 50 मिलियन फॅन्ससाठी मानले चाहत्यांचे ‘आभार’!

आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळवणे आणि ब्लॉकबस्टर रेकॉर्ड तोडण्याव्यतिरिक्त, दीपिका पादुकोणने आणखी एक अभिमानास्पद गोष्ट आपल्या नावे केली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. सोशल मीडियावर तिचे एकनिष्ठ चाहते असून जगभरात देखील तिचे चाहते आहेत. 
 
दीपिका अशा कलाकारांपैकी एक आहे जी आपल्या सफलतेचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत साजरा करते आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या चाहत्यासोबत संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असते. चाहत्यांनी देखील नेहमीच अभिनेत्रीवर आपल्या प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढेच नव्हे, तर विविध प्रेक्षकांनी अभिनेत्रीसाठी खास व्हिडीओ आणि कोलाज बनवले आहेत आणि ते बनवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, ती कौतुकास्पद आहे. 
 
चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमासाठी दीपिका स्वत:ला नशीबवान समजते. दीपिकाने चाहत्यांच्या या प्रेमासाठी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली असून सोशल मीडियावर तिच्या सर्व फॅन क्लबचे आभार मानले आहेत.
 
सोशल मीडियावर दीपिकाच्या फॉलोअर्सची संख्या अगणित आहे. आणि याच कारणासाठी ती या मंचाचा खूप चांगला उपयोग करते. मग ते मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्याबाबत बोलणे असो किंवा आपल्या उत्तम आवडीबाबतचे बोलणे, तिचे चाहते दीपिकाची प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. सोशल मीडियाद्वारे हा लाखो लोकांवर पडणारा तिचा प्रभाव आहे की ती सर्वांची आयडॉल आहे. 
 
कामाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, दीपिका पादुकोण लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी दिग्दर्शनात दिसणार आहे. जर लॉकडाऊन नसते, तर अभिनेत्री श्रीलंकेमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असती.