रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (08:00 IST)

अवघ्या चोवीस तासांमध्ये 'दिल बेचारा'च्या ट्रेलरला सर्वाधिक लाईक्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आगामी किंबहुना त्याच्या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या चोवीस तासांमध्ये 'दिल बेचारा'च्या ट्रेलरला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. जागतिक स्तरावर या चित्रपटाच्या ट्रेलरनं सर्वाधिक लाइक्स मिळवले आहेत. ज्या धर्तीवर या ट्रेलरनं 'ऍव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर'लाही मागं टाकलं आहे. 
 
  'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड पटाच्या आणि याच नावाच्या जॉन ग्रीन यांच्या कादंबरीतील कथानकावरच 'दिल बेचारा'चं कथानक आधारलेलं आहे. मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.