मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (15:02 IST)

कुठलीही हेडलाइन्स पवार कुटुंबियांना लक्ष केल्याशिवाय होत नाही – सुप्रिया सुळे

supriya sule
सतत पवार कुटुंबियांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे लक्ष करत असून त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्या भागात कृषी विधेयकसाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी रॅली काढली.
 
त्याच भागात त्यांच्या विचाराचा साखर कारखाना बंद असल्यामुळे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच हेडलाइन्स पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय होत नसल्यामुळे कोणीही यावे आणि आपले मन मोकळे करावे, आम्ही दिलदार असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, दोन दिवसांत पुणे शहरातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढाच्या कामाबाबत वर्क ऑर्डर काढली जाणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पुण्यामध्ये होणाऱ्या पूर परिस्थितीस आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नसून दोन वर्षांपूर्वी सीमा भिंत पडली असून अद्यापही त्याचे काम पूर्ण झाले नाही. तर २५ वर्षाचा हिशोब यामध्ये कसा होऊ शकतो, असा प्रतिप्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारत त्यांच्यावर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला.