बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (07:38 IST)

सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाचे नाव

महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव अद्याप जाहीर केले नाही आहे. मात्र  ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत विचारले होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी नाना पटोले यांच्या नावाचा उल्लेख केला. परंतु सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याला काँग्रेसने अद्याप दुजोरा दिला नाही. त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप माहित नसले तरी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलं कामकाज पाहत आहेत असे सुशीलकुमार यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण यावर तर्कवितर्क लढवले जात आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे गांधी घराण्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना प्रदेशाध्यक्षाचे नाव माहित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाना पटोले हे विधासभा अध्यक्ष आहेत. तसेच नाना पटोले ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत.