1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (14:23 IST)

दहावी, बारावीचा निकाल जूनमध्ये जाहीर

maharashatra board
यंदा दहावी आणि बारावीचा निकाल जून मध्ये जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 10 जून पर्यंत तर 10वीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 20 जून पर्यंत जाहीर होण्याचे सांगण्यात आले आहे. 
 
यंदा दोन वर्षानंतर कोरोनामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली आहे.तांत्रिक कारणास्तव परीक्षेच्या वेळापत्रकात फेरबदल देखील करावा लागला. यंदा दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते  7 एप्रिल पर्यंत झाल्या. आता परीक्षा नंतर उत्तरपुस्तिका तपासणी सुरु झाली असून 10 वी आणि 12 वी चा निकाल जूनमध्ये येणार.