शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (11:30 IST)

नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात

Nana Patole, Maharashtra
रात्रीच्या सुमारास भिलेवाडा गावाजवळ नान पटोले यांचा अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या ट्रकने त्यांच्या ताफ्याला जोराची धडक दिली. हा अपघात खूप भीषण होता. गाडीची मागील बाजूचा चक्काचूर झाला. नाना पटोले हे त्याच गाडीत बसले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून नान पटोले हे रात्रीच्या सुमारास सुकळी या गावी परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. तसेच या अपघातामुळे गाडीचे नुकसान झाले, तसेच नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहे. ट्रक भरधाव होता तसेच तो अनियंत्रित झाल्या मुळे थेट ताफ्यामध्ये घुसला. 
 
सध्या सर्वीकडे लोकसभा निवडणूक असल्यामुळे प्रचार सुरु आहेत. नाना पटोले हे देखील प्रचार करून परतत होते. व रात्रीच्या सुमारस भीषण अपघात झाला. नाना पटोले हे ज्या गाडीमध्ये होते त्या गाडीची मागील बाजू अपघातात चक्काचूर झाली. तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे, व पोलीस तपास करीत आहे.   

असा अंदाज काढण्यात आला आहे की, हा ट्रक भरधाव असल्यामुळे व ट्रक चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक ताफ्यामध्ये घुसला. पण सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून कोणतीही दुखापत कोणाला झाली नाही. नाना पटोले यांनी देखील सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. मंगळवारी महाविकास आघाडीने आपल्या जागा जाहीर केल्या असून, आता उमेदवारांच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहे. तसेच नाना पटोले यांनी देखील भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथे प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. व हा प्रचार झाल्यानंतर परतत असतांना हा अपघात झाला. 
 
Edited By- Dhanashri Naik