1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 12 मे 2025 (15:08 IST)

SSC Result : उद्या दुपारी 1 वाजता लागणार 10वीचा निकाल

SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवरून विषयानुसार (SSC Result) गुण पाहता येतील व त्याची प्रिंट घेण्याचीही सुविधा असेल. शाळांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.
 
निकालानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांमध्ये (श्रेणी विषय वगळून) गुणपडताळणी (SSC Result), उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हे अर्ज मंडळाच्या https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर 14 मे ते 28 मे 2025 दरम्यान करता येतील. यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे अनिवार्य आहे. छायाप्रती मिळाल्यानंतर पाच कार्यदिवसांत अर्ज करावा लागेल.
 
फेब्रुवारी -मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणी गुणसुधार योजने अंतर्गत पुढील तीन परीक्षा मध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. 
इयत्ता 10 वीच्या पुरवणी परीक्षांसाठी अर्जप्रक्रिया गुरुवार 15 मे 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार असून या मध्ये पुनर्परीक्षा, श्रेणीसुधार आणि खाजगीरित्या प्रविष्ट होणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या बाबतचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit