गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2024 (20:25 IST)

षटकार मारल्यानंतर फलंदाज खाली कोसळला, हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

death
कोरोनाच्या काळापासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, गायक केकेपासून अनेक अभिनेते आणि नेत्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये क्रिकेट खेळताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही सेकंद आधी त्याने शानदार षटकार ठोकला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 
 
सदर घटना ठाणे येथील असून एका उद्यानात काही जण क्रिकेट खेळत असताना एक फलंदाज एका सोप्या चेंडूवर शानदार षटकार मारतो आणि चेंडू मैदानाबाहेर जातो. नंतर तो पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतो. पण लगेच तो पुढच्या क्षणात खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो. मैदानातील इतर खेळाडू लगेच त्याच्याकडे धाव घेतात आणि पाहतात की त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आल्यावर डॉक्टर त्याला मृत घोषित करतात त्याचा मृत्यूचे कारण हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आपली मते मांडत आहेत
 
Edited By - Priya Dixit