1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मार्च 2025 (16:54 IST)

वाल्मिक कराडचा सर्वात मोठा पुरावा सापडला

Valmik Karad
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड त्यांना त्यांच्या खून केल्या प्रकरणी अटक केली आहे. 
वाल्मिक कराड ज्यांना आका देखील म्हणतात. त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.  या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मिक कराड दोषी असल्याचे पुरावे दिले आहे.मात्र कराड यांच्या वकिलाने दिलेल्या युक्तिवादात त्यांनी कोणाकडूनही थेट खंडणी मागितली नाही असे सांगण्यात आले. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवा पुरावा लागला आहे.  
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागण्यात आली या संदर्भात व्हिडिओचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तसेच खंडणी कोणाच्या आदेशावरून मागण्यात आली माहिती हाती लागली आहे. 

या मध्ये सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीला कराड यांच्या सांगण्यावरून आवादा कंपनीकडून खंडणी आणण्यासाठी पाठवले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण मोबाईलमध्ये कैद केले. व्हिडीओ मध्ये घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगताना दिसत आहे की कंपनीच्या 100 लोकांना सांभाळण्या ऐवजी कराड यांना संभाळण्याकडे लक्ष द्या आणि कराडांनी मागितलेले 2 कोटी रुपये त्यांना द्या म्हणजे तुमचे काम देखील सुरळीत होणार. 
गेल्यावेळी मी आल्याची तक्रार तुम्ही पोलिसांना केली असून कराड यांना हे समजले आहे आणि ते यावर खूप रागावले आहे. त्यांची मागणी पूर्ण करून द्या अन्यथा तुमचे काम बंद करण्यात येईल अशी धमकी अधिकाऱ्यांना घुले देताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. 

आता या व्हिडीओमुळे वाल्मिक कराड यांच्या वकिलाने दिलेले युक्तिवाद खोटे ठरले असून वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
Edited By - Priya Dixit