शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:13 IST)

कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे : आदित्य ठाकरे

कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत महसुली नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
याआधी मेट्रोची जागा आरे कारशेडवरुन कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्यात आली. त्यानंतर भाजपाने शिवसेनेवर आणि खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. आता कांजूरच्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. त्यामुळे कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.