सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (07:34 IST)

झेंडावंदन करणा-यांची यादी केली जाहीर

independence day 2023
The list of flag bearers has been announced  स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर आला आहे. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. त्यातच स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री झेंडावदन करत असतात. मात्र, पालकमंत्री निश्चित नसल्याने राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली.
 
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन करÞणार आहेत.
 
देवेंद्र फडणवीस (नागपूर), अजित पवार (कोल्हापूर), छगन भुजबळ (अमरावती), सुनील मुनगंटीवार (चंद्रपूर), चंद्रकांत पाटील (पुणे), दिलीप वळसे पाटील (वाशिम), गिरीश महाजन (नाशिक), गुलाबराव पाटील (जळगाव), हसन मुश्रीफ (सोलापूर), अतूल सावे (परभणी), तानाजी सावंत (धाराशिव), अब्दुल सत्तार (जालना), धनंजय मुंडे (बीड), संजय बनसोडे (लातूर), हिंगोली (जिल्हाधिकारी), नांदेड येथेही जिल्हाधिकारी झेंडा वंदन करणार आहेत.