मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (14:57 IST)

चिखलाच्या रस्त्यानं घेतला चिमुकल्याचा जीव

सध्या राज्याला पावसानं झोडपलं आहे. नदीपात्र, नाले, धरणे, तुडुंब भरले असून राज्यातील काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवस पावसाचा जोर कायम असून राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी केलं आहे. नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. रस्त्यातील खड्ड्यात देखील पाणी भरलं आहे. गावातील रस्त्यावर सर्वत्र पाण्यामुळे चिखल झालं आहे. औरंगाबाद येथे चिखलाच्या रस्त्यामुळे एका 8 वर्षाच्या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात जुने लखमापूर ला वास्तव्यास असलेल्या मुलाच्या पोटात खूप वेदना होत होत्या. हा मुलगा वेदनेमुळे कळवळत असताना पाहून त्याच्या वडिलांनी  त्याला दुचाकीवरून रुग्णालयात नेण्याचे ठरविले वेदनेने कळवळत असताना त्याला उलटी झाली. त्याला घेऊन त्याचे वडील जुने लखमापूर ते लखमापूर मार्गावरून दुचाकी वरून जात असताना त्याची बाईक चिखलात अडकली आणि मोटार सायकल काढण्यात बराच वेळ गेला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी चिमुकला दगावला. कृष्णा बाबुलाल परदेशी असे या मयत मुलाचे नाव आहे. राज्यातील काही पुनर्वसित गावात शासनाने अद्याप काही सोयी दिलेल्या नाहीत त्या,मुळे गावातील रस्त्याची अवस्था वाईट आहे. शासनाच्या दुर्व्यवस्थेमुळे एका निष्पाप जीवाला आपल्या जीव गमवावा लागला. या मुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पुनर्वसित गावात शासनाने लक्ष द्यावे आणि रस्त्याचे काम करावे आणि सर्व सुविधा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.