बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:35 IST)

राज्यात नवा कृषी कायदा लागू होणार नाही, केंद्रावर जोरदार टीका

ल्या कृषिविधेयकांविरोधात महाराष्ट्रातही संताप आहे. याच संतापाचा उद्रेक आज महाराष्ट्रात पाहायला मिळाला. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधेयकाच्या प्रती जाळून निषेध केला. 
 
केंद्राचं शेतकरीप्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका त्यांनी केली. दुसरीकडे सरकारही केंद्राचे नवे कृषिकायदे राज्यात लागू करणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला होता. विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी यात भाग घेतला.