1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. The passenger bus fell into the river

Buldhana bus accident प्रवाशांची बस नदीत कोसळली

accident
शेगाववरून पुण्याच्या दिशेनं निघालेली बस पैनगंगा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 1 महिलेचा मृत्यू झाला आहे. (One passenger died and some passengers injured in Buldhana bus accident)
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुण्याला निघाली होती. या अपघातामध्ये बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 17 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत.
 
बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली.
पुढील लेख
कुनो नॅशनल पार्कमध्ये तिसरा चित्ता मरण पावला, प्रोजेक्ट चित्ताला आणखी एक धक्का