शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:02 IST)

संतापजनक, अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके डुकराने तोडले

नांदेडमधील विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे डुकरं (वराह) लचके तोडत असल्याच्या धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता.
 
 सकाळी या मृतदेहाला डुकरं खात असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. डुकारांना नागिरकानी हाकलून लावले पण तोपर्यंत डुकरानी अर्धाधिक मृतदेह खाल्ला होता. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण, मनोरुग्न, भिकारी पडून असतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडल्याने नागरिकातुन संताप व्यक्त केला जात आहे. हा मृतदेह साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वी परिसरात पडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.