1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (20:46 IST)

भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं हा असतो, - नागराज मंजुळे

Nagraj Manjule
नागराज मंजुळे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. न केवळ बोलण्यात तर वागण्यात देखील मंजुळे यांचा साधेपणा दिसून येतो. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यात कलाकार प्रवीण डाळींबकर याने घरी येण्याची विनंती केली, तेव्हा नागराज हे शहरातील भीमनगर येथील डाळींबकरच्या घरी पोहोचले होते. नागराज मंजुळेंचा हा साधेपणाच अनेकांना भावतो. त्यांच्या भाषेतही ओढून ताणून शब्दप्रयोग नसतात, तर मनात आहे तेच ओढावर दिसते, तोच साधेपणा भाषेतही जाणवतो. आता. भाषा या विषयावरही नागराज यांनी तितक्याच परखडपणे आपलं मत मांडलं आहे.  
 
शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं हा असतो, अशा शब्दात भाषा या शब्दाची व्याख्यात नागराजने मुंबईतील एका कार्यक्रमात केली. नागराजने येथील कार्यक्रमात मोटीव्हेशनल स्पीकरची भूमिकाच निभावली, अशा शब्दात त्याचं भाषण झालं. माझ्यासारख्या खेड्यातील दगड फोडणाऱ्याच्या मुलाला मी काही तरी करू शकतो, या आत्मविश्वासानं मला इथपर्यंत आणलं, असेही नागराज यांनी म्हटले. तर, भाषेची शुद्धता आणि सुंदरता यावरही परखडपणे आपले विचार मांडले. 

Edited by : Ratnadeep Ranshoor