गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (15:20 IST)

नागपूरमधील मनसेची कार्यकारिणी बरखास्त हे आहे कारण

maharashatra navnirman sena
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आहेत. तसेच बैठकांच्या माध्मयातून ते पक्षबांधणी करत आहेत. दरम्यान आज त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरमधील मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली. लवकरच येथे तरुण नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. मला मागील १६ वर्षांत पक्षीय पातळीवर जी प्रगती दिसायला हवी होती, ती दिसली नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 
नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी भेटणं झालं. या भेटण्यातून नागपूर शहराची तसेच पक्षातील नागपूर जिल्ह्यातील सर्व पदं मी बरखास्त करतोय. येणाऱ्या २६ आणि २७ तारखेला घटस्थापना होईल, तेव्हा मी नवी कार्यकारिणी जाहीर केली जाई. यामध्ये काही जुने कार्यकर्ते असतील, काही नव्या कर्यकर्त्यांना संधी दिली जाईल. आमची २७ तारखेला मुंबईत पक्षाची बैठक आहे. त्यानंतर २८ तारखेला ते नागपूरमध्ये परत येतील. तेव्हा ते नागपूर तसेच इतर शाखांची बांधणी करतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
 
आज पक्षाला १६ वर्षं झाली. मात्र या काळात मला नागपूरमध्ये जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरमध्ये पक्ष वाढलेला नाही. नागपूरमध्ये अनेक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मला वाटते, असे राज ठाकरे म्हणाले.