शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (21:20 IST)

सोनी हत्याकांड; नऊ वर्षानंतर मिळाला न्याय

jail
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर ९ वर्षांनी निकाल लागला आहे. तुमसर येथे नऊ वर्षांपूर्वी सराफा व्यावसायिक, त्याची पत्नी व मुलगा यांच्या हत्येप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
 
हा निर्णय दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सुनावला. हत्याकांड्याच्या तब्बल नऊ वर्षापर्यंत नंतर या प्रकरणात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये शहानवाज ऊर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज ऊर्फ सोहेल युसूफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी नावे आहेत.

Edited By-Ratnadeep Ranshoor