शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (15:24 IST)

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना गारपीटीचा फटका

nashik rain
अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला पुनः एकदा तडाखा बसला आहे. गारपीट आणि अवकाळी पाऊस यांमुळे विदर्भात पिकांच मोठ नुकसान झाल आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु येऊन शेतकरी हवलादिल झाला आहे. खूप कष्ट करून पिकं वाढवली आणि मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्याच्या तोंडातला घास हिरवला गेला. यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. त्यांचा परिस्थितिशी संघर्ष सुरु आहे. शेतकरी हमीभावासाठी वर्षानुवर्षे झगडत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भातील नागपुर, वर्धा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शेतात उभी असलेली पिके ही जमीनदोस्त झाली आहे. 
 
शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पाऊस नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पडला. तसेच नागपुर जिल्ह्यात हिंगणा, मौदा, भिवापूर या तालुक्यातील काही गावांमध्ये पावसासोबत गारपीट झाली. गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं नुकसान झाले आहे या अवेळी आलेल्या पावसामुळे. तसेच अमरावती, वर्धा, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली असून गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी  बरसल्या आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. व हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा बसला आहे. जवळपास अर्धा तास गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे ग्रामीण भागात गहू, चणा, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. 
 
खासदार रामदास तडस यांच्याकडून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेले नुकसानाची पाहणी करण्यात आली. त्यांनी शेतात बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानीची माहिती घेतली. व तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. देवळी तालुक्याला गारपीटचा  तडाखा बसला असून गारपीटमध्ये गहु, चना, तूर, कापसाचे  मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. 
 
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर आणि किनवट तालुक्यात सायंकाळी गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. नांदेड आणि विदर्भा जवळ हे तालुके आहेत. तसेच संध्याकाळ पासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले. यामुळे मोठया पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील  बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा, देवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, चना, तूर आणि ज्वारी पिकांचं या अवकाळी पावसाच्या संकटमुळे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील गोंदळी, मुबारपूर, एरंनगाव येरणगाव, विरखेड, वाढखेड गवंडी गावांतील पिकांना गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. 3 हजार हेक्टरवर या तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे या वर्षी खरिपात शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले आहे. व रब्बी हंगमातील चने आणि गहु काढणीला येत असतांना अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. खरिपातील पिक विमाची मदत मिळाली नसून आता आलेल्या या संकटमुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik