रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (08:34 IST)

सांगली आटपाडी शहरातील ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केला

cash gold
सांगली आटपाडी शहरातील ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केला. रोख पावणे सहा लाख रूपये, 21 किलो चांदीचे दागिने, 20 तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे सांगोला (जि. सोलापूर) आणि आटपाडीतून वाहनांची चोरी करून चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

आटपाडीच्या मुख्य पेठेत यपावाडीतील शंकरबापू चव्हाण यांच्या मालकीचे ओम गणेश ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सला रविवारी सुट्टी असते याची माहिती घेती रेकी करत चोटय़ांनी ज्वेलर्सचे शटर, भारीभक्कम लॉक तोडून चोरटय़ांनी ज्वेलर्समधुन सात किलो वजनाचे झुम, पैंजण, साडेसहा किलो वजनाचे लहान पैंजण, तीन किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, करंड, ताट, ग्लास, साडेचार किलो वजनाचे आगरा पायल, 20leesUs सोन्याच्या दागिन्यांचे मोड आणि 5 लाख 75 रोख असा ऐवज चोरट्यांनीलंपास केला.
 
दुकानाच्या वरील बाजूस रहायला असलेल्या दस्तगीर शेख यांच्या पत्नीने खाली चोरटय़ांच्या हालचाली पाहून आरडा-ओरडा केला. हे पाहून चोरट्यांनी चारचाकी गाडीतुन सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पोबारा केला. त्यानंतर दस्तगीर शेख यांनी घटनेची माहिती सोमवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमार शंकरबापू चव्हाण यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जलद धाव घेतली असता चोरट्यांनी शटर खुले ठेवून दागिने, रोकड घेवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. चोरटय़ांनी ज्वेलर्समधील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही फोडला आहे.