मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (16:00 IST)

भुसावळ आगारातून सुटलेल्या पहिल्या बसवर दगडफेक

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला घेऊन कामगारांनी संप पुकारला आहे. गेल्या 20 दिवसानंतर पहिली बस भुसावळच्या आगारातून निघाली. भुसावळ ते बोदवड जाणाऱ्या या बस वर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. 
एसटीचे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता गेल्या 20 दिवसापासून संपामुळे एसटी बसेस बंद होत्या. अनिल परब यांनी पगारवाढीची  घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचारी आज कामावर रुजू झाले. आज तब्बल २० दिवसानंतर भुसावळ आगार मधून बोदवडच्या बस सोडण्यात आलाय. या बस वर दीपनगर जवळ काही अज्ञातांनी दगडफेक केली. आणि बसच्या काचा फोडल्या. 
बस मध्ये आठ प्रवाशी होते. या दगडफेकीत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.