आज शिवसेनेचा 58 वा स्थापना दिवस,दोन्ही गटांकडून राजकीय कार्यक्रमांचे आयोजन
शिवसेनेचा आज 58 वा स्थापना दिवस साजरा होत आहे. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची राजकीय संघटना म्हणून स्थापना केली. स्थापना दिनानिमित्त शिवसेनेचे दोन्ही गट (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे) राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.
शिवसेना (UBT) तर्फे सायंकाळी 6 वाजता षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.उद्धव ठाकरे सर्व नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार असून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
तर मुंबईतील वरळी येथे शिवसेना शिंदे गटाचा कार्यक्रम होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी 5 वाजता नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले की, शिंदे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदस्यत्व मोहीम, मतदार नोंदणी मोहीम आणि योजनांची रूपरेषा आखली जाईल.
शिवसेनेची स्थापना उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मुंबईत केली होती. शिवसेनेची मुख्य विचारधारा ही हिंदुत्व आहे.
Edited by - Priya Dixit