1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Toilet in front of Salman Khan home

सलमानच्या घरासमोरचे संडास हटवा : महापौर

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर उभारण्यात आलेलं शौचालय हटवण्याचे आदेश मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत. हे शौचालय नियमबाह्य रितीनं उभारले असल्याने ते हटवण्यात यावे अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर दिल्या. 
 
शौचालय हटवण्याच्या मुद्द्यावर वहिदा रेहमान, सलमान खानचे वडिल सलिम खान यांनी महापौरांची भेट घेतली. महापौर महाडेश्वरांनी वांद्रेतील स्थानिक रहिवाशांचे मुद्दे ऐकुन घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन हे शैाचालय हटवण्याबाबत सूचना दिल्या.
पुढील लेख
एसबीआयकडून गृह कर्जाच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात