शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

हगणदरीमुक्त राज्य करणार: मुख्यमंत्री

हगणदरीमुक्त महाराष्ट्र
मुंबई- महाराष्ट्रात आतापर्यंत चार लाख शौचालये उभारण्यात आली आहेत. आतापर्यंत 250 पैकी 200 शहरे हगणदरीमुक्त करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व शहरे व गावे हगणदरीमुक्त करून या वर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हगणदरीमुक्त राज्य करण्यात येईल.
 
यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात वेगाने नागरीकरण होत असताना त्याला नियोजनबद्ध स्वरूप दिले गेले नाही. पिण्याचे पाणी, कचर्‍याची समस्या, सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष दिले गेले नाही.